गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला, स्फोटक साहित्यांसह चार जण ताब्यात

674

– गडचिरोली पोलीस दलास मोठे यश
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये नक्षली घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात. काही इसम नक्षल्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणार असल्याची गोपनिय माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली असता काल १९ फेब्रुवारी रोजी गोपनिय माहितीच्या आधारे नक्षलविरोधी अभियाना राबवित असतांना ४ इसमांकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे. सदर कारवाईमुळे नक्षल्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे. राजु गोपाल सल्ला (३१) रा. आसिनगर, एनटीआर कॉलनी जि.करीमनगर (तेलंगणा), काशिनाथ उर्फ रवि मुल्ला गावडे (२४) रा. भंगारामपेठा ता. अहेरी, साधु लच्चा तलांडी (३०), मोहम्मद कासिम शादुल्ला रा. एनटीआर तामिल कॉलनी, बाबुपेठ, आसिफनगर जि. करिमनगर, छोटु उर्फ सिनु मुल्ला गावडे रा. भंगारामपेठा ता. अहेरी असे आरोपींची नावे असून यातील ४ जणांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे तर यातील छोटु मुल्ला गावडे हा फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडून शोध घेणे सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल १९ फेब्रुवारी रोजी गोपनिय माहितीच्या आधारे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येत असेलेल्या दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा गावात पोउपनि सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोस्टे पाटी व शिघ्र कृती दल दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ४ इममांकडून १० नग कार्डेक्स वायरचे बंडल एकुण ३५०० मिटर लांबीचे व इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरव्दारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हॅन्डग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टीसीओसी सप्ताह दरम्यान सदर स्फोटकांचा नक्षल्यांकडून मोठया प्रमाणात वापर केला जाणार होता.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन घोडके प्रभारी अधिकारी उपपोस्टे दामरंचा यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
सदर कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षल्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याबाबत सुचाना दिल्या आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here