– बसस्थानकासमोरील घटना
The गडविश्व
कुरखेडा, २० ऑगस्ट : कुरखेडा- देसाईगंज मार्गावर असलेल्या नविन बसस्थानकासमोर दोन दुचाकींची समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातत नगरसेवक सागर निरंकारी यांच्यासह तिन यूवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार १८ ऑगस्ट रोजी रात्रो ९ वाजताच्या सुमारास घडली.
नगरसेवक सागर निरंकारी व नौशाद सय्यद हे दोघे एका दुचाकीने देसाईगंज मार्गावर फेरफटका मारत परत शहराकडे येत होते दरम्यान याच मार्गावर सुसाट वेगात जात असलेला चंदन देशमुख याच्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली व रस्त्यावर कोसळले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिन्ही जखमींच्या हाता, पायाला गंभीर दुखापत झाल्याचे कळते. तिघेही कुरखेडा येथील रहिवासी आहेत.