गडचिरोली : पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना करावा लागत आहे पाणीटंचाईचा सामना

274

The गडविश्व
गडचिरोली : नगर परिषदेअंतर्गत मुख्य पाईपलाईनचे काम सुरू असल्याने गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस ४ व ५ मे रोजी बंद असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक चामोर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मुख्य पाईप लाईनचे शिफ्टिंगचे काम असल्याने शहरातील पाणीपुरवठा ४ व ५ मे रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले होते. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी अगोदरच्या दिवशी पाण्याची साठवणूक केली होती मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा जास्त वापर होत आहे त्यामुळे साठवलेला पाणी सुद्धा समाप्त होत आला आहे तसेच आज ६ मे रोजी सकाळच्या सुमारास पाणी पुरवठा होणार या प्रतीक्षेत नागरिक होते परंतु पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच आली व अनेकांनी हातपंप, तसेच विहिरीचा आधार घेत दैनंदिन कामे आटोपली व घरात पाणी भरल्याचे दिसते. शहरातील अनेकांच्या घरी नळाद्वारे पाणी पुरवठा होतो बहुतांश घरे ही नळाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे त्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याने याचा फटका अनेकांना बसला आहे. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here