गडचिरोली : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार, ट्रकचालक ताब्यात

453

THE गडविश्व
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप रस्ता ओलांडत असतांना भरधाव ट्रकने एका चितळाला धडक दिली असता चितळ जागीच ठार झाला. सदर घटना ट्रक चालकाच्या लक्षात येताच पसार होण्याच्या मार्गावर असतांना वनविभागाने मोठ्या शिताफीने आरोपीला व ट्रकला ताब्यात घेतले आहे. .
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून काल ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप मुख्य रस्ता ओलांडत असताना चामोर्शीकडून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्र. एमएच-३५ के – २७१० ने एका चितळाला धडक दिली यात चितळ जागीच ठार झाला. सदर घटना गडचिरोली वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र गडचिरोलीतील संपूर्ण वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेत असतांना सदर ट्रकचालक वडसा मार्गे गेल्याची माहिती वनपथकाला प्राप्त झाली. लगेच घटनेबाबत वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आणि सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांना देताच तात्काळ नाकेबंदी केली.
त्यावेळी ट्रकचालकाच्या लक्षात येताच ट्रक ठेऊन पसार होताच वनविभागाच्या कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने आरोपीचा मागोवा घेत आरोपी व ट्रकला ताब्यात घेत गडचिरोली वनाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले असून आरोपीवर वनगुन्हा नोंदविण्यात आला असून मृत चितळाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृत चितळाचे दहन करण्यात आले.
घटनेचा अधिक तपास गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात गडचिरोली वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, गडचिरोली क्षेत्र सहाय्यक अरुप कन्नमवार, वनरक्षक भारत राठोड, धर्मराव दुर्गमवार, वन्यजीव प्रेमी अजय कुकुडकर व सर्व वन कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here