गडचिरोली : ट्रकची स्कुल बसला जबर धडक, चालक वाहकासह १२ विद्यार्थी जखमी

2232

– नवेगाव कॉंम्पलेक्स येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया नजीक अपघात, अपघातात एक इसमही जखमी

The गडविश्व
गडचिरोली : येथील चंद्रपूर मार्गावरील नवेगाव कॉम्पलेक्स परिसरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया नजीक मुख्य मार्गावर पंचर स्कुल बसला मागच्या बाजूने मालवाहु भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना आज ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजाताच्या सुमासास घडली. ट्रकची धडक इतकी जबर होती की उभ्या पंचर स्कुल बसला धडक दिल्याने स्कुल बस ही रस्ता दुभाजकावर पलटी झाली तर ट्रक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जावून धडकला. या अपघातात स्कुल बसमधील चालक वाहकासह १२ विद्यार्थी व एक इसम जखमी झाला आहे. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, संत जोसेफ नॅशनल स्कुल डोंगरगाव, येवली गडचिरोली येथील स्कुल बस हीे विद्यार्थ्यांना घेवून जात असतांना नवेगाव कॉॅम्पलेक्स परिसरातील स्टेट बॅक नजीक मुख्य मार्गावर पंचर झाली. दरम्यान रस्ता दुभाजकाच्या कडेला स्कुल बस थांबवून पंचर दुरूस्त करीत असतांना गडचिरोली शहरातून येणाऱ्या सीजी ०४ एचएस १९६३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने स्कुल बसला मागच्या बाजुने जबर धडक दिल्याचे प्रत्क्षदर्शीनी सांगितले. या अपघातात स्कुल बस ही रस्ता दुभाजकावर पलटी झाली तर ट्रक हा स्कुल बसला धडक देत चन्नावर मेडीकल समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जावून धडकला. यात विद्युत खांब हा क्षतिग्रस्त झाला यात महावितरणचे २५ ते ३० हजारांचे नुकसान झाले आहे. या अपघातात स्कुल बस मध्ये असलेले चालक वाहक व १२ विद्यार्थी हे जखमी झाले आहे. तर याच दरम्यान रस्ता दुभाजकाच्या बाजूनेच मुडझा येथील इसम हा येत असतांना या अपघाताच्या तावडीत सापडला असता तो सुध्दा जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायाला जबर मार बसला आहे. अपघातातातील सर्व जखमींना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघात होतात ट्रक चालक हा घटनास्थळावून पसार झाला. अपघाताची माहीती होतात एकच गर्दी जमली होती तर पोलीस विभागाचे कर्मचारी सुध्दा दाखल झाले होते. दरम्यान मार्गावर काही काळ विस्कळीत झाली होती. वृत्त लिहेस्तोव पोलीस विभाग घटनास्थळी दाखल होते. पलटी झालेली अपघातग्रस्त स्कुल बस हि रस्ता दुभाजकावरून काढणे सुरु होते.

गडचिरेाली शहरातून दररोज अनेक जड अवजड वाहने जात असतात. दरम्यान हे वाहन शहरातून वेगमर्यादेचे कोणतेही पालन करतांना दिसत नाही. मुख्य इंदिरा गांधी चौक येथून सुध्दा या जड वाहनांची गती ही वेगमर्यादेपेक्षा अधीक असते त्यामुळे सुध्दा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतुक विभागाने लक्ष देवून जड अवजड वाहनांना ब्रेक लावणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here