– १२ मे पासून विविध विभागातील वर्ग ३ व ४ च्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रीया समुपदेशनाने
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हयांतर्गत बदली प्रकीया राबविण्यात येणार आहे. सदर बदली प्रकीया ५ ते १५ मे दरम्यान राबविण्यात येणार असून यामध्ये विनंती व प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारच्या जवळपास ४०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे.
सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद रजेवर असल्याने ते रजेवरून परत आल्यानंतर यासंदर्भातील प्रक्रियेला गती येणार आहे. १२ आणि १३ मे रोजी बदलीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
अवघड भागात सेवेची तीन वर्ष पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सुगम क्षेत्रात बदली देउन दिलासा देण्याबाबत शासन निर्णयात तरतूद आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करत जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाने पार पाडण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हयात अहेरी उपविभागासह कोरची, कुरखेडा व धानोरा तालुक्यात अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे. तर गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या चार तालुक्यांचा परिसर शहरी भागात मोडतो त्यामुळे जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी या भागात सेवा देण्यास तयार होतात. अहेरी उपविभागातील भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी या पाच तालुक्यात अजूनही सोयी सुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीतही अनेक कर्मचारी त्याच तालुक्यात सेवा देत आहेत. त्यामुळे आता अवघड भागात सेवेची तीन वर्ष पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सुगम क्षेत्रात बदली देउन दिलासा देण्याबाबच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाने पार पाडण्यात येणार आहे.
कोरोना संकटापूवी १० टक्के प्रशासकीय व १० टक्के विनंती अशा २० टक्के बदल्या करण्यात येत होत्या. अता कोरोनापासून एकुण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे.
१२ ते १५ मे दरम्यान होणार बदली प्रक्रिया
१२ मे रोजी महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, यांत्रिकी, ग्रामीण पाणी पुरवठा, सामान्य प्रशासन, वित्त आदी व १३ मे रोजी बांधकाम, आरोग्य व १४ मे रोजी सिंचन, शिक्षण व पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे.