The गडविश्व
गडचिरोली : शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. ९ मार्च पासून जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे. या मोहिमेमध्ये ३ कलापथके लोककलेच्या माध्यमातून जागर करीत आहेत.
कोरोना काळातील शासनाने राबविलेल्या योजना, शेतकरी पिक विमा, निरंतर शिक्षण, खावटी योजना, शिवभोजन, तसेच जनकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या गेल्या दोन वर्षातील योजना व निर्णयांबाबतची कलापथकाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या या लोकजागराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.“महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कलापथकांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. या मधील चांगले सादरीकरण केलेल्या तीन कलापथकांची निवड शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली असून त्यांच्या मार्फत १२ तालुक्यात ६३ ठिकाणी कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे”
– सचिन अडसूळ
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली