– काल काही ठिकाणी सर्वाधिक पाऊस
The गडविश्व
गडचिरोली,५ जुलै : जिल्ह्यात जून २०२२ पासून ते आजपर्यंत ९४.२ टक्के, २६३.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशी महिती हवामन खात्याने दिली आहे.
पावसाने दंडी मारली होती अशातच सोमवार ४ जुलै रोजी पावसाने मुसंडी मारत हजेरी लावली. त्यामुळे आता शेतकरीही सुखावला आहे. जिल्ह्यात जून महिण्यापासून ते अद्यापपर्यंत ९४.३ टक्के २६३.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून काल सोमवारी सर्वाधिक तीन ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये कुरखेडा १२६.४ मिमी, बेडगाव ता.कोरची १७९.६ मिमी, कोटगुल ता.कोरची १८६.६ मिमी या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
काल आलेल्या पावसाने अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले, अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी ही सुखावला आहे. येत्या २४ तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गेल्या २४ तासात पावसाची नोंद
गडचिरोली तालुका – बाम्हणी ७६.२ मीमी, पोर्ला ७९.४ मीमी, कुरखेडा तालुका – पुराडा ९३.४ मीमी, काढोली ८०.६ मीमी, आरमोरी तालुका – आरमोरी ७१.३ मीमी, देऊळगाव ७५.० मीमी, वैरागड ७०.४ मीमी, पिसेवडधा ७०.६ मीमी, कोरची तालुका- कोरची ९९.२ टक्के
गडचिरोली ६६.० मीमी, कुरखेडा १००.१ मीमी, आरमोरी ७१.८ मीमी, चामोर्शी २५.६ मीमी, सिरोंचा ३५.९ मीमी, अहेरी १९.२ मीमी, एटापल्ली ३३.मीमी, धानोरा ४७.५ मीमी, कोरची १५५.१ मीमी, देसाईगंज ५१.५ मीमी, मूलचेरा २२.२ मीमी, भामरागड ३६.० मीमी