गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक जाहीर

872

– महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार
– ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ७ जणांना पोलीस शौर्य पदक तर ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार

The गडविश्व
गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षीही गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असून यात चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ७ जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील ७ अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल २ पोलीस अधिकाऱ्यांना पदक जाहीर करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदके देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राने यंदा ५१ पदके मिळवले आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात एएसआय गोपाल मनिराम उसेंडी, एनपीसी महेंद्र गणू कुलेटी, पीसी संजय गणपती बकमवार, पीएसआय भारत चींतामन नागरे, एनपीसी दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी निलेश्वर देवाजी पदा, पीसी संतोष विजय पोटावी यांना पोलीस शौर्य पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल अतुल प्रताप सिंग असिस्टंट कमांडंट १९२ बीएन सीआरपीएफ गडचिरोली , बस्तर लक्ष्मण मडावी असिस्टंट पोलीस सब इन्सपेक्टर गडचिरोली यांना जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here