गडचिरोली : जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ग्रामपंचायतील सार्वत्रिक मतदान अंदाजे ७४.९४ टक्के

129

The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यात १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाची अंदाजित माहिती प्राप्त झाली आहे.
एटापल्ली तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार १०८९ असून ७१६ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी ६५.७५ टक्के एवढी आहे. देसाईगंतज तालुक्यात सहा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार ३२१८ असून २५२८ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७८.५६ टक्के एवढी आहे.
गडचिरोली तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार १८६२ असून १५५३ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ८३.४० टक्के एवढी आहे.
आरमोरी तालुक्यात तीन मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार १००३ असून ८५६ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ८५.३४ टक्के एवढी आहे.
भामरागड तालुक्यात बारा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार ४६०६ असून २९८५ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ६४.८१ टक्के एवढी आहे.
धानोरा तालुक्यात नऊ मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार २३४७ असून १८६ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७९.२९ टक्के एवढी आहे.
चामोर्शी तालुक्यात नऊ मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार ७१८९ असून ५४४१ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७५.६९ टक्के एवढी आहे.

अहेरी तालुक्यात सहा मतदान केंद्रात स्त्री व पुरुष यांचे एकूण मतदार २६८५ असून २०४६ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ७६.२० टक्के एवढी आहे.
याप्रमाणे आठही तालुक्यात मतदान सकाळी ७.३० वा. पासून ते दुपारी ३.००वा. पर्यंत झाले. एकत्रित अंदाजित आकडेवारी घेतली असता झालेले एकूण मतदार संख्या २३९९९ असून मतदारांनी मतदान केलेली संख्या १७९८६ एवढी आहे. तर टक्केवारी ७४.९४ एवढी प्राप्त झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here