– जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार गजबेंना पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश
The गडविश्व
देसाईगंज : मागील महिनाभरापासुन गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंपाच्या २४ तास सुरळीत विज पुरवठ्यावरुन रान पेटविल्या जात असतानाच या गंभीर मुद्याला घेऊन आज १८ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मुद्दा उपस्थित करताच या संदर्भात तत्काळ निर्णय घेऊन गडचिरोली जिल्हा भारनियमन मुक्त करणाचे आश्वासन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मार्ग मोकळा करु असे आश्वासन दिले आहे.
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात आमदार गजबे यांनी आदिवासी बहुल नक्षलग्रस्त, अतिदुर्गम,अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने येथील शेतकऱ्यांना पूर्णता शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे विदारक सत्य मांडून जिल्ह्यातील सिंचनाचा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला होता.खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीच्या बसलेल्या फटक्यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी २४ तास सुरळीत विज करण्याची मागणी केली असता ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र उलटपक्षी १६ तास विज पुरवठा करण्यात येत असताना कृषी पंपाना ८ तासच विज पुरवठा करण्या संदर्भात परिपत्रकच काढण्यात आल्याने नाईलाजाने येथील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे भाग पडले होते.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार गजबे यांनी संपर्क साधून येथील समस्या अवगत करुण उद्याच्या केबिनेट मध्ये घेतो म्हणाले आहे. दिली असता पालकमंत्री यांनी याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. तथापी आज १८ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार गजबे यांनी मुद्दा उपस्थित केला असता या संदर्भात मंञी मंडळाच्या बैठकीत तातडीने समस्या निकाली काढुन गडचिरोली जिल्ह्यातील भारनियमन संपवून २४ तास सुरळीत विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने आमदार गजबेंच्या पाठपुराव्याचे मोठे यश असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.