गडचिरोली जिल्हयात आज ६६ नव्या बाधितांची नोंद तर १३२ कोरोनामुक्त

94

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1063 कोरोना तपासण्यांपैकी 66 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 132 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37036 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 35718 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 551 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 767 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.49 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 09, अहेरी तालुक्यातील 12,आरमोरी तालुक्यातील 02, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 05, मुलचेरा तालुक्यातील 09, सिरोंचा तालुक्यातील 08, कुरखेडा तालुक्यातील 13 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 132 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 40, अहेरी तालुक्यातील 05, आरमोरी तालुक्यातील 07, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 13, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 02, मुलचेरा तालुक्यातील 01, सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 33, आणि वडसा तालुक्यातील 22 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here