गडचिरोली जिल्हयात आज ३२८ नव्या कोरोना बाधितांची नोंद तर २८४ कोरोनामुक्त

285

The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात आज 1092 कोरोना तपासण्यांपैकी 328 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 284 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34217 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32123 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1341 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.88 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.92 टक्के तर मृत्यू दर 2.20 टक्के झाला आहे.
आज नवीन 328 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 69, अहेरी तालुक्यातील 33, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 126, धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, मुलचेरा तालुक्यातील 10, सिरोंचा तालुक्यातील 03, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 13 आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 284 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 139, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 38, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 24, सिरोंचा तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 14,आणि वडसा तालुक्यातील 06 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here