गडचिरोली जिल्हयात आज २९२ बाधितांची नोंद तर २६६ कोरोनामुक्त

274

– पुर्व आजार असलेल्या दोघांचा कोविडने मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1137 कोरोना तपासण्यांपैकी 292 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 266 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 35572 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 33727 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1082 झाली आहे. आज दोन मृत्यूमध्ये ब्रम्हपूरी तालुका जि.चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश असून ती सिकलसेल आजराने ग्रस्त होती. तर कुरखेडा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष किडनी आजाराने ग्रस्त होती. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 763 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.04 टक्के तर मृत्यू दर 2.14 टक्के झाला आहे.
आज नवीन 292 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 42, अहेरी तालुक्यातील 05, आरमोरी तालुक्यातील 05, भामरागड तालुक्यातील 72, चामोर्शी तालुक्यातील 50, धानोरा तालुक्यातील 30, एटापल्ली तालुक्यातील 31, मुलचेरा तालुक्यातील 12, सिरोंचा तालुक्यातील 30, कोरची तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील 05 आणि वडसा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 266 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 90, अहेरी तालुक्यातील 11, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 60, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 23, मुलचेरा तालुक्यातील 05, सिरोंचा तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील 08,आणि वडसा तालुक्यातील 26 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here