गडचिरोली जिल्हयातील आठवडी बाजार सुरू करा

294

– जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली मागणी

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील आठवडी बाजार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आजपर्यंत बंद आहे. आज कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला आहे. अनेक निर्बध शिथील करण्यात आले आहे. याचाच विचार करता गडचिरोली जिल्हयातील बंद असलेला आठवडी बाजार सुरू करून शेतकऱ्यांसह बेराजगारांनी दिलासा दयावा अशी मागणी नागरिकांनी जिल्हयाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हातील आठवडी बाजारही बंद करण्यात आला असून अदयापर्यत बंद आहे. परंतु याचा थेट परिणाम शेतकऱ्यावर पडत असून शेतकऱ्याला योग्य तो बाजारभाव मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागत आहे. जिल्हयात अनेक बेरोजगार असल्याने ते सुध्दा बाजारपेठेत आपला छोटामोठा व्यवसाय उभारून उदरिर्वाह करीत होते. मात्र मागील दोन वर्षापासून आठवडी बाजारपेठ बंद असल्याने त्यांच्यावर सुध्दा उपासमारिची वेळ आली आहे. करीता या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील आठवडी बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी हेमंत जंबेवार, देविदास आखाडे, रूपेश वलके, आशिष गेडाम, रूपेश झरकर, नयन मडावी, अमोल भांडेकर, मुझादीद पठान, समिर भांडेकर, नागेश लटारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here