गडचिरोली जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता MPSC पूर्व प्रशिक्षण

2674

The गडविश्व
गडचिरोली : आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदशन केंद्र गडचिरोली च्या वतीने गडचिरोली जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता MPSC पूर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समितीच्या विविध पदभर्ती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा प्रशिक्षण
कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवाराकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण व
रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी साडे तीन महिने आहे.प्रशिक्षणा दरम्यान दरमहा रु. 1000/- विद्यावेतन दिले जाईल, कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज 18 जुलै 2022 पर्यंत कार्यालयात सादर करावेत तदनंतर त्यांच्या मुलाखती 21 जुलै 2022 रोजी आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदशन केंद्र गडचिरोली iयेथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 07132-295143 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार,व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here