गडचिरोली जिल्हयाच्या दक्षिणेस जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के

3371

– ३. ८ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के
The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑक्टोबर (Gadchiroli) : जिल्हयाच्या दक्षिण भागात मध्यरात्रीच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर दक्षिणेस असलेल्या सिरोंचा तालुक्यातील मेडाराम चेक, झिंगानूर तसेच अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली, जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के मध्यरात्री १२ : ४१ वाजता १० किमी खोलीसह ३. ८ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के बसले. मात्र यात कोणतीही जीवीत व वित्तहाणी झालेली नाही.
यापूर्वी १ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६.५० वाजता गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ) ७७ किमी खोलीसह ४. ३ रिस्टर स्केलचे धक्के बसले होते. तब्बल एका वर्षानंतर त्याच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

(#gadchirolinews #gadchiroli #Earthquakes #southgadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here