– वयाची शंभरी पुर्ण करत यशोदाबाई तंदरूस्त
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील खुर्सा येथील श्रीमती यशोदाबाई मारोतराव चापले यांनी वयाची शंभरी पुर्ण केली आहे. वयाची शंभरी पुर्ण करूनही आजही त्या तंदरूस्त असल्याचे कळते. काल 8 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस खुर्सा येथे उत्साहात संपन्न झाला.
त्यांना तीन मुले व दोन मुली असून सर्वांचे विवाह झाले आहेत. तसेच यशोदाबाई यांना सुना, जावई, नातु, नात सुना, पडनातु असा बराच मोठा आप्त परिवार आहे. स्व. जैराम मारोतराव चापले, केशव मारोतराव चापले, भगवान मारोतराव चापले हे तीन मुले व सौ.पुष्पा दुमाजी ठाकरे, सौ. पुष्पा देवाराव उरकुडे हया त्यांच्या मुली. हे सर्व विवाहित आहेत. श्रीमती यशोदाबाई यांच्या वयाचे काल 8 फेब्रुवारी रोजी शंभर वर्ष पुर्ण झाले. यावेळी काल त्यांचा शंभरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आल्या. त्या शंभर वर्षाच्या झाल्या असल्यातरी आजही त्या शरीराने तंदरूस्त आहेत. वयाचे शंभरी पुर्ण केल्याने त्यांच्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.