गडचिरोली : उपचारादरम्यान नीलगायीचा मृत्यू

193

The गडविश्व
गडचिरोली : वडसा वनविभागांतर्गत येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील बोरी नियतक्षेत्र 50 मध्ये जखमी असलेल्या निलगायीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, पोर्ला वनपरिक्षेत्रातील बोरी नियतक्षेत्र 50 मध्ये नीलगाय जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मंगळवारी सकाळच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनतर सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.मडावी यांना देण्यात आली. त्यांनी लगेच पोर्लाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सावरकर यांना सोबत घेवून आले. डाॅ. सावरकर यांनी निलगायीवर उपचार केला. मात्र रात्रो उशिरा नीलगायीचा मृत्यू झाला. सदर निलगायीच दोन झाडांच्या मध्ये फसली असावी व ती गंभीर जखमी झाली असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी मृत निलगायीचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here