The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : जिल्ह्याविषयी माहिती, जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांविषयी इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरविणाऱ्या “गडचिरोली आयजी (@gadchiroli_ig) पेज परिवाराकडून जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा पुरवला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अनेकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने जीवनावश्य वस्तू वाहून गेले, नासाडी झाली. अनेक कुटुंब पुरामुळे घर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कमलापूर परिसरातील कमलापूर, लिंगमपल्ली येथील पूर पीडित शेकडो कुटुंबांना “गडचिरोली आयजी (@gadchiroli_ig) पेज इंस्टाग्राम परिवाराने मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक किट्सचे वाटप केले. यावेळी नागरिकांनी सदर परिवाराचे धन्यवाद मनात समाधान व्यक्त केले.
पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे कुटुंब उघडयावर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी हातभार लावून अशा कुटुंबाना मदत करावी असे आवाहनही “गडचिरोली आयजी (@gadchiroli_ig) पेज इंस्टाग्राम परिवाराकडून करण्यात आले आहे.