गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जण जखमी

1003

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ४ किमी अंतरावरील गुरवळा रोडवर विहिरगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार १७ जून रोजी घडली. राजू कवडू बोदलकर( ५०) रा.( राखी )गुरवळा असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे तर भीमराव नगराळे रा, (राखी) गुरवळा असे जखमी इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, राजू बोदलकर व भीमराव नगराळे हे दुचाकीने गडचिरोली वरून परत आपल्या गावी जात होते. दरम्यान विहिरगाव फाट्यानजीक अज्ञात चार चाकी ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात राजू बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला तर भीमराव नगराळे हे जखमी झाले आहे. घटनेची माहिती होतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले तर जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here