गडचिरोलीत आरोग्य विभागामार्फत हिवताप दिन साजरा

218

The गडविश्व
गडचिरोली : २५ एप्रिल हा दिवस हिवताप दिन म्हणुन साजरा करण्याकरीता जिल्हा हिवताप कार्यालाय गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृह गडचिरोली येथून, प्रशिक्षण केंद्राच्या शिकाबू परिचारीका विदयार्थीनी, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांची प्रभात फेरी ब्दारे गावातील चौका-चौका मधून फेरी काढून हिवताप विषयक घोषवाक्याच्या निनादात फेरी काढून महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे फेरी विसर्जीत करुन सभेचे आयोजन करण्यात आले.
महिला व बाल रुग्णालयातील सभागृहामध्ये जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून सभेचे आयोजन करण्यात आले. सभाध्यक्ष म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, प्रमुख अतिथी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे , महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिपचंद सोयाम, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जठार, अतीरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल मडावी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समिर बन्सोडे, जि.प.गडचिरोली नोडल ऑफिसर डॉ.पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम हिवतापाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून सभेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुनाल मोडक यांनी प्रास्ताविकातून हिवतापाचा पार्श्वकालीन इतिहासाची माहिती सांगून अतिप्राचीन वैदिक काळात हिवतापाचा उल्लेख “सर्व रोगाचा राजा” असल्याचे सांगितले. डॉ रोनाल्ड रॉस यांनी हिवताप हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे असे संशोधन केले व त्यानंतर खऱ्या अर्थाने हिवताप नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाल्याचे सांगितले. प्रसाराबाबतची माहिती आणि घ्यावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची विस्तृत माहिती सांगून जिल्हयाची हिवतापाबाबतची आकडेवारी सुध्दा सांगितली. महीला व बालकाची हिवताराच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीबाबतमहिला व बाल रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिपचंद सोयाम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी हिवतापाबाबत दिरंगाई न करता वेळीच उपचार घेतल्यास जिवीतहानी टाळता येऊ शकते आणि ज्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले. सभाध्यक्ष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल गाढवे यांनी यावर्षीचे घोषवाक्य “हिवताप रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी व लोकांचे प्राण वाचविण्यासाठी नविन संकल्यनाचा वापर करणे” यावर मार्गदर्शन केले. नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजने देरीज नवनविन कल्पना कर्मचाऱ्यांनी या कामी वापरण्यास सांगितले.
तसेच राष्ट्रीय जंत विरोधी दिवसाचे महत्व सांगुन ६ महिण्यातून एकदा जंत विरोधी औषधीचे सेवन करावे असे सांगितले. वर्षभरात हिवताप कार्यक्रमाअंतर्गत विशेष उल्लेखनिय काम केलेले कर्मचारी वैशाली रामदास मोगरे आशा, लाहेरी प्रा.आ.केंद्र लाहेरी, परशुराम डुब्बलबार, क्षेत्र कार्यकर्ता, जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली, सुरेखा धुढले, हंगामी वरीष्ट क्षेत्र कार्यकर्ती ग्रा.रुग्णा, भामरागड. विक्रम दडमल, आरोग्य सेवक उपकेंद्र बेरकड, प्रा.आ.केंड नुरुमगाव, विजय मुलकलवार, आरोग्य सहाय्यक प्रा.आ.केंद्र गट्टा. अशोक एडलाबार, आरोग्य पर्यवेक्षक पं.स.अहेरी. पद्माकर घोरमाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रा.आ.केंद्र कोटगूल, संकेत बेगलोपवार मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय अहेरी, राजेश आर, कार्लेकर, जिल्हा व्ही,बी. डी.सल्लागार जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
सभेचे सुत्र संचालन राजेश कार्लेकर यानी केले. तसेच आभार तारकेश्वर अंबादे आरोग्य सहाय्यक जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली यानी केले. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर/अधिकारी बंद कार्यक्रमानंतर गडचिरोली शहरातील कारमेल हायस्कूल येथील सभेस उपस्थित होवून जागतिक हिवताप दिनाविषयी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here