गडचिरोलीत “महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा” संपन्न

371

– पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांची उपस्थिती
गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील शेतकरी पारंपारीक पिक पद्धतीवर अवलंबुन असल्यामुळे ते आर्थिक दृष्टया कमकुवत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योगासाठी वाव देवून त्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन व कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन सोनापुर व आत्मा गडचिरोली यांचे संयुक्त विदयमाने पोलीस महासंचालक सा. महाराष्ट्र राज्य, मुंबई रजनिश शेठ सा., याचे उपस्थितीत १२ एप्रिल २०२२ रोजी महारोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे आयोजन करण्यात आले.
सदर महारोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात दुर्गम भागातील १९० शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन सोनापुर व आत्मा गडचिरोली यांचे मार्फतीने पोलीस महासंचालक सा. यांचे हस्ते १३० शेतकऱ्यांना बि-बियाणे, शेती उपयोगी साहित्य व १० शेतकऱ्यांना वराहाच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमीटेड हैद्राबाद यांच्या मार्फतीने ५० सुरक्षा रक्षक पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ति प्रमाणपत्र व भरती पूर्व पोलीस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २०० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचे किट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४६५, नर्सिंग असिस्टंट ११४३ हॉस्पीटॅलीटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल ड्यूटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०५ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ३४३, बदक पालन १०१, शेळीपालन ६७, शिवणकला ७०, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड १९०, पोलीस प्रशिक्षण ७८०, दु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ३७० असे एकुण २०१७ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर मेळाव्यास अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रविण साळुंखे सा., विशेष पोलीस महानिरीक्षक नागपुर छेरिंग दोरजे सा., पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील सा. , पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा, प्रकल्प संचालक आत्मा संदीप कन्हाडे हे उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here