गडचिरोलीत बियाणे, खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रुमची स्थापना

217

– शेतकऱ्यांच्या समस्या, बियाणे, खते व इतर बाबींचा काळाबाजार होत असल्यास नियंत्रण कक्षात तक्रार करण्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात २०२२-२३ चा खरीप हंगाम लक्षात घेऊन बियाणे, खते व किटकनाशकांचा काळाबाजार होण्यावर प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बियाणे, खते व इतर बाबींचा काळाबाजार होत असल्याचे निर्दशनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात तक्रार द्यावी, अशी माहीती गडचिरोलीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना गावस्तरावर येणाऱ्या अडचणीबददल आता तक्रारी करता येणार आहेत. जिल्हास्तरावर स्थापना केलेल्या कंट्रोल रुममध्ये महाराष्ट्र राज्य शासन कृषि विभाग व जिल्हापरिषदेच्या कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना भ्रमनध्वनी क्रमांक 9404535481 या क्रमांकावर शेतकऱ्यांना संपर्क करता येईल. हा क्रमांक शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी समपात ( डेडीकेटेड) करण्यात आला असुन शेतकऱ्यांनी तक्रार करावयाची असल्यास सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत वरिल क्रमांकावर तक्रार नोंदविल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. कंट्रोल रुममध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठाची गुणवत्ता, किंमत साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारीबाबत प्रत्येकाच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,गडचिरोलीचे बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.

खरिप हंगाम सुरु झालेनंतर कृषि केंद्रावर निविष्ठा खरेदी करणेसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असते. अशावेळी शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुनच कृषि निविष्ठा खरेदी करावे. बियाणे खरेदी करतांना खरेदीची पक्की पावती, लॉट नंबर, अंतीम मुदत तपासावे.सोबतच ते जपुन ठेवावे. अनधिकृत विक्रेत्याकडुन बियाणे खरेदी करुन नये.
-संजय मेश्राम,
जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here