गडचिरोलीत छायाचित्रकार दिनानिमित्त अपंग विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप, फळ वाटप व वृक्षारोपण

232

The गडविश्व
गडचिरोली, २० ऑगस्ट : छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, द्वारा संलग्नित गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो बुक अल्बम गडचिरोली च्या वतीने १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त गडचिरोली येथील निवासी अपंग विद्यालय लांजेडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप, फळ वाटप व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपंग शाळेचे मुख्याध्यापक यशजी हर्ष, अधीक्षक डोनाटकर, एस पी जोशी, सुनिता रामपूरकर, घनश्याम ठाकूर, मनोज रुणझुणे, राजू मेटे, निखिल सहारे, प्रवीण चांदुरकर, रवी मेश्राम, दर्शना मेश्राम, चेतन सामृतवार व तसेच गडचिरोली तालुक्यातील सर्व छायाचित्रकार बांधव आणि अपंग शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
१९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार यांचा शाल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले. त्यामध्ये नंदू भाऊ नागेश्वर, राजू मने, विलासजी मेटे, सुभाष जी बांगरे, अविनाशजी अंडेलवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे आयोजक गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो अल्बम गडचिरोलीच्या वतीने निवासी अपंग विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here