गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी अपात्र

296

– ६ वर्षांच्या कालावधीसाठी ठरविले अपात्र
– नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश केले जारी

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांना तिसऱ्यांदा आणि विशेष म्हणजे कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला. त्यांना या आदेशापासून ६ वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कालच त्यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपुष्ठात आला आणि याच दरम्यान त्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला. या अगोदर दोनवेळा अपात्र ठरविण्यात आले होते पण दोन्हीवेळी पिपरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागून मंत्रालयाचा आदेश रद्दबातल ठरविला होता.
तसेच मुख्याधिकारी व लेखापाल यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याबाबत प्रशासकीय कारवाई सुरू करण्याचे आदेशात म्हटले आहे. नगर परिषद सभेच्या मंजुरीशिवाय प्रतिपूर्ती बिल घेतल्याचा ठपका पिपरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here