The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ नोव्हेंबर : तालुक्यातील रांगीचे तत्कालीन ग्रामसेवक खुशाल नेवारे यांना जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सन २०१७ -१८ ते २०- २१ यावर्षीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते शाल श्रिफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गडचिरोली येथिल नियोजन भवनात गौरविण्यात आले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, विशेष अतिथी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य शेखर शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कणसे, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी (पंचायत )महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले , अरमोरीचे गटविकास अधिकारी हिवगे, ग्रामसेवक युनियन गडचिरोली अध्यक्ष बनपुरकर, राज्य कार्याध्यक्ष तथा सरचिटणीस ग्रामसेवक युनियन गडचिरोली दामोदर पटले आदि मान्यवर उपस्थित होते. धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवक खुशाल नेवारे हे सन २०१७- १८ ते १९- २० या कालावधीत रांगी येथे कार्यरत होते. रांगी गावाला १५ वर्ष सेवा दिलि. रांगी येथे कर्तव्य बजावत असताना २००७-८ मधे सुद्धा आर्द्रश ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केले होते हे विशेष. त्यांनी समाज कार्य करताना अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले तसेच अनेक लोकांना सढळ हाताने मदत केली. त्यातच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. नवोदित जोडप्यांचा स्वागत दिवाळीत गावाच्या वतीने करण्याचाही उपक्रम सुरू केलेला होता. या सोबतच अनेक चांगले काम त्यांनी केले. त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे निश्चितच कौतुक झाले. पुरस्काराचे खरे भागिदार रांगी वासिय असल्याचे सांगितले . त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
प्रास्ताविक कणसे (पंचायत) उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तर संचालन कुमारी बासंती देशमुख ग्रामसंघटक गडचिरोली यांनी केले तर आभार खुशाल नेवारे जिल्हा कोषाध्यक्ष ग्रामसेवक युनियन गडचिरोली यानी मानले.
