खा.अशोक नेते यांच्या हस्ते ‘कारगील चौक’ स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन

194

The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्याने कारगील चौक स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन खासदार अशोक नेते याच्या हस्ते सोमवार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी करण्यात आले.
कारगील हे नाव तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी प्रधानमंत्री असतांना कारगील युद्ध झाले. या कारगील युद्धात अनेक शूरवीरांनी, हुतात्म्यानी, बलिदान देऊन कारगील विजय मिळविला. त्याच विजयाचे प्रतीक म्हणून कारगील हे नाव देण्यात आले. कारगील विजय दिवस हा प्रत्येक नागरिकांना महत्वाचा व आपल्या देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. आज १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कारगील चौक स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन होत आहे ही अतिशय आनंदाची उत्साहाची बाब आहे असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
या कारगील चौक सौंदर्यीकरणाच्या कामाची मागणी मागील अनेक वर्षापासून होती ती आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण झाली ही एक कौतुकास्पद बाब आहे.
याप्रसंगी खा.अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जि.महामंत्री प्रमोद पिपरे, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे, शहर महामंत्री मुक्तेश्वर काटवे, माजी न.प उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी न.से. वैष्णवी नैताम, रामटेके ताई, मुख्याधिकारी विशाल वाघ, बेंबरे, इंजि.भालेराव, उपमुख्याधिकारी भंडारकर, प्रीती काकरकर, पठानताई, सुंदराताई करकाडे, वच्छलाताई मुंघाटे, तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here