खासदार अशोक नेते आज सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

158

– पुरग्रत भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतील

The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑगस्ट : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे आज ७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे.
सकाळी ८ .०० वाजता गडचिरोलीवरुन सिरोंचासाठी प्रयाण, दुपारी १२.३० वाजता सिरोंचा सा.बा.विश्रामगृह येथे आगमन, दुपारी १.३० वाजता नगरम येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकीटचे वाटप करतील, दुपारी २.३० वाजता पेटीपाका येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकिट वाटप, दुपारी ३.३० वाजता सोमनपल्ली येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व अपघात ग्रस्तांना शिधाकिट वाटप, सायं ४.०० वाजता सोमनपल्लीहुन सिरोंचा करीता प्रस्थान, सायं- ५.३० वाजता सिरोंचा येथे सा.बा.विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांसोबत भेट, सायं- ६.३० वाजता सिरोंचा वरुन गडचिरोली करीता प्रस्थान करतील.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात आले होते. आज गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते हे सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करीत असून पुरग्रस्त नागरिकच्या समस्या जाणून त्यांना मदत करणार आहे. तसेच समस्या जाणून घेऊन ते शासन दरबारी मांडणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here