The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानातर्फे एटापल्ली, अहेरी, चामोर्शी व कोरची येथील तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकचा एकूण ५० रुग्णांनी लाभ घेतला.
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. गुरुवारी एटापल्ली क्लिनिकमध्ये १३, शुक्रवारी अहेरी १३, चामोर्शी १२ व कोरची क्लिनिकला १२ दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांनी भेट दिली. अशा एकूण ५० रुग्णांनी क्लिनिकचा लाभ घेतला. सोबतच रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगत समुपदेशन व औषधोपचार करण्यात आले.