कोवीड आजाराने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत आवाहन

130

– अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यास ९ मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्र सादर करावे

The गडविश्व
गडचिरोली :

कोवीड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रूपये इतके सानुग्रह देण्याबाबत तरतूद आहे त्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात. मात्र अर्ज करूनही अद्यापही सानुग्रह बँक खात्यात जमा झाले नाही अशा वंचित अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे ९ मे २०२२ पर्यंत आपत्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजय मीना यांनी केले आहे.
कोविद १९ आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह साहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाणे शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसीत केले आहे. याव्दारे कोविड १९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहायय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल याकरिता ऑनलाईन पोर्टलची सुविधा केली आहे.
यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in वा https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे.

तथापी सदर ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करूनही अदयापही ज्या अर्जदारांना ५० हजार रूपये रक्कम बॅंक खात्यात जमा झालेली नाही अशा अर्जदारांनी ९ मे २०२२ पर्यत आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे अर्जदाराचे व मृत व्यक्तीेचे आधार, मृत्यू प्रमाणपत्र, एमसीसीडी प्रमाणपत्र, अर्जदाराचे बॅंक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संजय मीना यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here