– राज्यातील १० मंत्र्यांसह २० आमदार कोरोनाबाधित
THE गडविश्व
वृत्तसंस्था / मुंबई : कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली माहिती अजूनच धक्कादायक आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील १० मंत्री , २० आमदार (mla) कोरोना बाधित झाले आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अशात राज्यात राजकीय कार्यक्रम आणि बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळं त्यांना भेटलेले दुसरे नेत्यांची चिंता वाढली आहे तर सेल्फीसाठी धडपडत जवळ येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र धडकी भरली आहे. विशेष म्हणजे बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे.