–साध्या पद्धतीने होणार साजरी, गर्दी ना करण्याचे आवाहन
The गडविश्व कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या कुमकोट येथील मंडई कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. 60 गावची देवी राजराजेश्वरी राजमाता यांच्या पूजा अर्चनेकरिता दरवर्षी जत्रेच्या दिवशी हजारो भाविक मंदिरात दर्शना करीता येतात. दरवर्षी या देव मंडई मध्ये अनेक दुकाने, झूले, मिठाई, भाजीपाला, हॉटेल, प्रसाद अशा विविध प्रकारची दुकाने या मंडई ची शोभा वाढविन्याकरीता सज्ज असतात. छत्तीसगड, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक देव मंडई निमित्य येत असतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या मंडईची सुरुवात ही कुमकोट च्या देव मंडई पासुनच होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 12 जानेवारीला कुमकोट देवमंडई तसेच जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संपुर्ण देशभरात वाढलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रतिबंधात्मक निर्बंध शासनाच्या वतीने लावण्यात आले आहे. ज्यामुळे नियमांचे पालन करून शासनाच्या निर्देशानुसार या वर्षी देवमंडई निमित्य आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून यावर्षी कुठलीही गर्दी जमा न करता फक्त देवीची पूजा अर्चना करून देवमंडई शांततेत होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार यावर्षी होणाऱ्या या मंडई मध्ये व्यवसायाकरिता येणाऱ्या सर्व दुकानदारांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या मनोरंजनाकरीता दरवर्षी होणारे छत्तीसगडी कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे....