कोरची चा जांभूळ ब्रॅन्ड बनवा : डॉ.किशोर मानकर

399

The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रामणात जांभळाचे उत्पादन घेतल्या जाते. त्यामुळे सदर जांभुळ तसेच मुल्यवर्धित पदार्थाचे ब्रॅन्ड बनविल्यास मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होईल. जांभळाच्या प्रक्रियायुक्त पदार्थाना खुप मोठी मागणी आहे. साध्या जांभळांच्या बियांपासून पावडर करून विकल्यास वर्षभर मागणी आहे. ह्या संधीचा लाभ शेतकऱ्यांनी तसेच बचत गटांनी अवश्य घ्यावा आणि जांभुळ प्रक्रिया करून मुल्यवर्धन करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी केले.
ते १ जुलै २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग, वनविभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद, कृषि विभाग, जिल्हा परिषद, कृषि महाविद्यालय, कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “जांभुळ महोत्सव – २०२२” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते. २५ जुन २०२२ ते १ जुलै २०२२ दरम्यान कृषि संजिवनी सप्ताहाचे समारोप १ जुलै २०२२ रोजी कृषि क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या जयंती निमित्य कृषि दिनाचे औचित्य साधुन आयोजीत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ पिकाखालील लागवडीचे क्षेत्र वाढ होण्याच्या दृष्टीने आणि जांभळाचे मुल्यवर्धित पदार्थांना चालना देण्याकरिता “जांभुळ महोत्सव – २०२२” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. किशोर मानकर, मुख्य वनसंरक्षक, वनविभाग, गडचिरोली, धनाजी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली, प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली, डॉ. राजेंद्र भुयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली, एस. डी. जाधव, अध्यक्ष, जात पडताळणी समिती, समाज कल्याण, गडचिरोली, बाडे, जिल्हा मृदा संर्वेक्षण अधिकारी, गडचिरोली, तुमसरे, जिल्हा कृषि विकास अधिकारी, गडचिरोली, एस. एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली, आशिष घरई, एस. टी. आर. सी., गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. शालीनी बडगे, सहयोगी प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली, सचिन अडसुळ, जिल्हा माहीती अधिकारी, गडचिरोली, चेतना लाटकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, गडचिरोली, कृषि महाविद्यालय आणि कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील डॉ. विक्रम एस. कदम, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), नरेश पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र), पुष्पक ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), ज्ञानेश्वर व्ही. ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी), सुचित लाकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), डॉ. निलीमा पाटील, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) आणि जिल्ह्यातील शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित होते.
यावेळी धनाजी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गीकरित्या जांभळाचे उत्पादन मिळते परंतु जांभुळ हे अल्पायुषी असल्यामुळे त्यास प्रक्रिया करून मुल्यवर्धन करणे गरजेचे आहे. जांभळामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे जांभुळ रस, सुपारी, जॅम, जेली, लाडू तसेच चॉकलेट, आईसक्रीम असे छोटे उद्योग उभारून महिला बचत गटांनी सक्षम होणे गरजेचे आहे. आज जांभुळ उत्पादनांचा तसेच मुल्यवर्धीत प्रक्रियायुक्त पदार्थाचा जिल्हा म्हणून अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख व्हावी असे प्रतिपादन केले.
डॉ. प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली यांनी जांभुळ हे अल्पआयुषी असल्यामुळे मुल्यवर्धित पदार्थ तयार करून विक्री करावी आणि आपले स्थैर्य उंचवावे असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जांभळापासून ज्युस, जॅम, जेली चॉकलेट यासारखे मुल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात असे प्रतिपादन केले.
डॉ. राजेंद्र भुयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली यांनी जांभुळाचे औषधी गुणधर्म, तसेच आरोग्यास पोषक जिवनसत्वे विषयी विशेष मार्गदर्शन केले. जांभुळ फळे सोबतच पाने आणि जांभुळ सालाचे आरोग्यवर्धक गुण उपस्थितांना समाजून सांगितले.
एस. एस. काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली यांनी जांभुळ महोत्सवाची रूपरेषा समजावून सांगितली. तसेच जांभुळ पिकाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जांभुळ महोत्सव शेतकऱ्यांसाठी पर्वणीच असल्याचे म्हटले.
चेतना लाटकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, गडचिरोली यांनी उमेद मार्फत राबविण्यात येणारे महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकला तसेच महिला बचत गटांच्या कार्याचे यशोगाथ उपस्थितांना सांगीतले.
तुमसरे, जिल्हा कृषि विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कृषि विभाग, जिल्हा परिषद व्दारा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहीती दिली.
बदाडे, जिल्हा मृदा संर्वेक्षण अधिकारी, गडचिरोली यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषि विषयक योजनांची माहीती दिली तसेच जांभुळ प्रक्रिया उद्योगाकरीता प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग विषयी माहीती दिली.
डॉ. शालीनी बडगे, सहयोगी प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली यांनी जांभुळ पिकाची लागवड तंत्रज्ञान, जाती, कालावधी व वैशिष्ट्ये विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी जांभळाचे स्थानिक विविध जाती, जांभुळाचे मुल्यवर्धित पदार्थाचे दालन उभारण्यात आलेले होते. तसेच जांभुळ फळ पिक लागवड, जांभुळाचे विविध पदार्थ विषयी विशेष मार्गदर्शन आले. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे संचलन डॉ. निलीमा पाटील आणि आभार सुचित लाकडे ह्यांनी मानले. जांभुळ महोत्सावास नागरीकांचा तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here