कृपाळा व मुरूमबोडी येथे व्यसन उपचार क्लिनिक ; २८ रुग्णांवर उपचार

139

The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील कृपाळा व मुरूमबोडी येथे गाव पातळी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून २८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना गावातच व वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागात क्लिनिकचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या क्लिनिकचा लाभ घेतला आहे. तसेच उपचार घेतलेल्या रुग्णांचा पाठपुरावा देखील केला जातो. कृपाळा व मुरूमबोडी गावात गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते.
कृपाळा गावातील १५ रुग्णांनी या क्लिनिकचा लाभ घेतला. रुग्णांवर समुपदेश व औषधोपचार करण्यात आले. रुग्णांची केस हिष्ट्री संयोजक छत्रपती घवघवे तर समुपदेशन अरुण भोसले यांनी केले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले.यावेळी पोलिस पाटील बालाजी मेश्राम उपस्थित होते. मुरूमबोडी येथील १३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावेळी सरपंच लता मडावी उपस्थित होते. दोन्ही गावातील एकूण २८ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here