कुरखेडा येथे आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन

191

The गडविष
ता. प्र / कुरखेडा, ५ ऑक्टोबर : राष्ट्रपिता म्हात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कुरखेडा येथे आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सर्व प्रथम लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांच्या फोटोला माल्यार्पण करुण रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी बहुसंख्य कार्यकर्ता हजर होते. दरम्यान नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश हि घेण्यात आला. राष्टपीता महात्मा गांधी, लालबाहादु शास्त्री यांचा आदर्श शहीद भगतसिंग यांचे देशासाठी चे बलीदान उपस्थितांनी विसरु नये असे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यकारीणी च्या वतीने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हाश्मी यांनी केले. कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, जिल्हा महिला युवा संयोजक सोनल न्ननावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तर प्रकाश जवानी, तब्येत पठाण इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here