कुरखेडा : कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचे दुःखद निधन

571

The गडविश्व
कुरखेडा : येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई योगेश्वर काळेवार (३४) यांचा आज मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी दूपारी ३ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असताना दुःखद निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाने पोलीस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस शिपाई योगेश्वर काळेवार हे आज दुपारच्या सुमारास कुरखेडा येथील नविन बसस्थानकासमोर पोलीस चमू द्वारे लावण्यात आलेल्या नाकाबंदी वाहन तपासणी मोहीमेत कर्तव्यावर होते . दरम्यान दुपारी २.३० वाजताच्या सूमारास त्याना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी जवानांनी त्यांना जवळच असलेल्या शहरातील खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. शिपाई काळेवार यांच्या मृत्यु ची वार्ता पसरताच येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
योगेश्वर हे मूळचे वाढोणा ता.नागभीड जि.चंन्द्रपूर येथील असल्याची माहिती आहे. ते गडचिरोली जिल्हा पोलीस दलात सन २०१३ मध्ये शिपाई पदावर रूजू झाले होते. त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.त्यांच्या पश्च्यात बराच मोठा आप्तपरीवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here