कुरखेडा : विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

1111

– आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ७ नोव्हेंबर : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या उराडी येथील विवाहित इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संदीप मारोती कुलसंगे (३२) रा.उराडी ता.कुरखेडा जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या विवाहिताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हा विवाहित असून पत्नी माहेरी गेली असल्याचे कळते या दरम्यान तो लहान भावाकडे जेवण करीत असायचा मात्र सोमवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरातच त्याने धाब्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन कुरखेडा येथे देण्यात आली . पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पाठविण्यात आला, पोलीस स्टेशन कुरखेडा येथे घटनेसंदर्भात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

#kurkheda #suside #gadchiroli #uradi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here