कुरखेडात भिषण अपघात : अनियंत्रीत टिप्परने टॅक्सीसह ८ दुचाकींना चिरडले

707

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील कुरखेडा येथे काल १ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भिषण अपघात झाला. हा अपघात एवढा भिषण होता की डांबर मिक्स गिट्टी घेवून जाणारा टिप्पर अनियंत्रीत झाला व रस्त्याच्या कडेला असलेली काळी पिवळी टॅक्सीसह ८ दुचाकीना चिरडत दुकानाच्या समोरील शेडला धडक दिली. सदर अपघात कुरखेडा शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या समोरील परिसरात झाला. अपघातात जिवीतहानी झाली नाही मात्र वाहनांची प्रचंड मोडतोड झाली व एका इसमाच्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा डांबर प्लांट वरून डांबर मिक्स गिट्टी घेवून जाणारा टिप्पर बांधकामच्या साईटवर जात होता. दरम्यान टिप्पर चालकाचे टिप्परवरील नियंत्रण सुटल्याने टिप्परने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी पिवळी टॅक्सीसह ८ दुचाकींना चिरडले. यावेळी दुकानासमोरील शेडलाही धडक दिल्याने त्याची मोडतोड झाली. यावेळी नागरिकांनी वेळीचा प्रसंगावधान राखत पळापळ केल्याने जिवीतहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here