कुंभी मोकासा येथील आपत्कालीन रुग्णाला बोटीने बाहेर काढून दवाखान्यात केले भरती

636

– जिल्हा प्रशासनाची यशस्वी मोहीम

The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : तालुक्यातील कुंभी मोकासा येथील आनंदराव मेश्राम या डायलोसिसच्या रुग्णाला नदीला पूर असल्याने बोटीने बाहेर काढून दवाखान्यात भरती केल्याची यशस्वी मोहीम जिल्हा प्रशासनाने आज १८ जुलै रोजी केली.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाकी आहे. अशातच गडचिरोली तालुक्यातील कुंबी मोकासा येथील डायलेसीस आजार असलेल्या आनंदराव मेश्राम यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र शिवणी जवळील नाल्यावर पूर असल्याने अडचण निर्माण झाकी होती. याबाबत गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना माहीत होताच त्यांनी आरोग्य विभागाला तातडीने संपर्क केल्यानंतर आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला व सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीच्या चामोर्शी मार्गावर शिवणी ते चामोर्शी मार्ग बंद असल्याने व गुरुवाळा मार्गही नाल्यावरून पाणी वाहत असल्याने बंद होता. कुंभी मोकासा येथून सदर रुग्णाला शिवणी नाल्याच्या तिथून बोटीने बचाव करून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्याचे नियोजन करण्यात आले. पोलीस विभागाच्या MTS च्या बचाव पथकाने तातडीने बोट आणि आवश्यक मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवून रुग्णाला सुखरूप बोटीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून यशस्वी मोहीम राबविली.
यावेळी शिवणी नाल्याच्या येथे सदर मोहिमेदरम्यान गडचिरोली पोस्टेचे पोलीस निरीक्षक कतलाम, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here