काय ती झाडी, काय ती शेणखताची ढिगारे, आण काय ती शौचालयाची घाण, एकदम बेकार …..

869

– धानोरा नगरपंचायत चे दुर्लक्ष, गुडमॉर्निंग पथक कुचकामी

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ५ ऑगस्ट : सरकार कितीही स्वच्छताच्या बाता करत असतील, कितीही स्वच्छता मोहीम राबवित असेल तरीपण जोपर्यंत नागरिकांचा सहभाग नसेल तर त्या स्वच्छता मोहिमेला हरताळ फसला जातो असाच प्रत्येय धानोरा नगरपंचायत मधील वार्ड नंबर एक मधील सुखदेव टेकाम यांच्या घरापासून ते वार्ड नंबर दोन पर्यंतचा रोड हा अस्वच्छतेने माखलेला आहे. म्हणून काय ती झाडी, काय ती शेणखताची ढिगारे, आण काय ती शौचालयाची घाण, एकदम बेकार …..अशीच म्हणायची वेळ आलेली आहे असून याकडे धानोरा नगरपंचायत चे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
सुखदेव टेकाम यांच्या घरापासून बोडी आहे. या बोडी व रोड च्या बाजूला शेणखताचे ढिगारे आहे ते शेणखताचे ढिगारे कोणाचे हा प्रश्नच आहे. सुखदेव टेकाम यांच्या घरापासून १०० मीटर सिमेंट रोड आहे. त्यांच्या घरापासून हॅन्ड पंपा पर्यंत अस्वच्छतेने माखला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे वाढली आहे. याचाच फायदा घेऊन सकाळी व रात्री अंधारात स्त्री- पुरुष व लहान मुल रस्त्यावर शौचालय करतात. त्यामुळे शौचालय व शेणखताची दुर्गंधी मोठया प्रमाणात येते परंतु याकडे नगरपंचायत व नगरसेवकाचे अजिबात लक्ष नाही. याबाबत नगरसेवकाला माहिती असूनही त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपंचायत चे कर्मचारी सुद्धा त्या रस्त्याने नाक दाबून जातात पण कोणालाच काहीच दिसत नाही एकदम ओके गुवाहाटी सारखे वाटत असेल त्यांना अशी अवस्था आहे. काय झाडी, काय वास, एकदम ओके आर्रर्रर्र ! एवढेच नाही तर नगरपंचायतची गाडी “का करे भैया” वाजवत कचरा गाडी येते, कचरा जमा करून ठेवायचा आणि गाडी आल्यावर गाडीत कचरा टाकायचा एवढ सोपं काम आहे परंतु तसे न होता तेथील विद्युत खांबाजवळ जवळ परिसरातील नागरिक घरातील कचरा टाकून घाण करतात व त्याच्या बाजूच्या असणाऱ्या ओट्यावर बसून वास घेतात. आता पावसाळा सुरु आहे या शेणखताच्या ढिगाऱ्याने व उघड्यावर शौचालय केल्याने साथीचे रोग पसरले तर याला जबाबदार कोण ? याकडे नगरपंचायत व नगरसेवकाचे सपशेल दुर्लक्ष होत असून वेळीच नगरपंचायतने रस्ताच्या दोन्ही बाजूची झाडें तोडून रस्ता साफ करावा व गुडमॉर्निंग पथकद्वारे उघड्यावर शौचालय करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धानोरा नगरपंचायत ला स्वच्छतेचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे . विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची स्पर्धा सुद्धा राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला परंतु त्याचा काही उपयोग दिसत नाही. नागरिकांच्या सहभागा शिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होत नाही हे यातून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here