बिबट्याला रोहित्रावर चढणे जिवावर बेतले

1263

– शिकारीच्या शोधात रोहित्रावर चढून करंट लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
The गडविश्व
वर्धा : रोहित्रावर करंट लागून बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी सेलू तालुक्यातील जयपूर येथे उघडकीस आली. शिकारीच्या शोधात बिबट्या रोहित्रावर चढला असावा व या दरम्यान करंट लागून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येते आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील जयपूर येथील बोर नदीच्या काठी वसलेल्या व विभागाच्या झुडपी जंगलाच्या प्लॅनटेशन परिसरात नागरिकांना युगे वास येत होता. दरम्यान नागरिकांनी याचा शोध घेतला असता बुधवारी सकाळच्या सुमारास पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर बिबट मृतावस्थेत आढळून आला. लागलीच याबाबत माहिती वनविभागाला देण्यात आली. सदर बिबट हा माकडासारख्या शिकारीच्या मागे लागून रोहित्रावर चढला असावा व त्याचा करंट लागून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वतीने लावण्यात येत आहे. घटनेची माहिती होताच वनविभागाचे व महावितरणचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here