ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध

347

– जिल्हा कार्याध्यक्ष संदिप तिमाडे यांची माहिती

The गडविश्व
चामोर्शी, १३ जुलै : भारतीय संविधानाने इतर मागासवर्गीय घटकांना दिलेले प्रतिनिधित्व डावलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये. आरक्षण जाहीर केल्यानंतरच निवडणूका घ्याव्यात. अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप तिमाडे यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आज १३ जुलै रोजी दिलेल्या प्रसिद्धी पञकात संदिप तिमाडे यांनी म्हंटले आहे की, जातीनिहाय प्रतिनिधीत्वाचे मुल्यांकन निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व घटकांची प्रथमतः जातीनिहाय जनगणना करावी. ज्यामुळे वस्तुनिष्ठ, संख्यात्मक माहिती गोळा झाल्यास ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यास सोईस्कर ठरेल. एकच आडनाव विभिन्न जातीत असल्याने अडनावांच्या आधारे इंपीरिकल डाटा संकलीत करणे हा सर्रास धुळफेक करण्याचा प्रकार असून तो तात्काळ थांबवावा. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे संदिप तिमाडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here