ऑनलाईन अर्ज करूनही लाभार्थी ३ वर्षांपासून ‘उज्वला गॅस’ कनेक्शनपासून वंचित

436

-अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांचे तात्काळ अर्ज निकाली काढा
-शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

The गडविश्व
गडचिरोली १ जुलै : केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या उज्वला गॅस योजनेकरिता जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. मात्र मागील तीन वर्षांपासून संबंधीत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन प्राप्त झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली असून या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनमधर प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत असून अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांचे तात्काळ अर्ज निकाली काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची दिला आहे.
केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बाराही तालुक्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत संबंधित पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात एचपी,भारत गॅस अशा दोन एजन्सी कार्यरत आहेत. पात्र लाभार्थ्यांमार्फत संबंधित गॅस एजन्सी धारकाकडे उज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यात आले आहे. मात्र मागील तीन वर्षांचा कालावधी लोटूनही संबंधित लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तात्काळ निकाली काढून उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रॉका प्रदेश नेते हेमंत जंबेवार, सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके, संदीप चापले, विनोद सहारे, हेमराज लांजेवार, आशिष गेडाम, विवेक कामळे, प्रफुल ठाकरे, नयन मडावी, अक्षय मेश्राम, समीर भांडेकर, अमोल भांडेकर, सचिन धात्रक आदींसह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here