The गडविश्व
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीकरिता एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनही संप सुरूच आहे. आज एसटी महामंडळ संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली होती. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून एसटी संप आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे असून उद्या सकाळी १० वाजता विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देणार असल्याचे कळते. १० मार्चच्या पर्यंत अल्टीमेट अगोदर एसटी संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते.