एनसीबीला मोठे यश : मुंबई विमानतळावर २४ कोटींचे हेरॉईन जप्त

270

The गडविश्व
मुंबई : येथील विमानतळावर एनसीबीने मोठी कारवाई करत एका परदेशी व्यक्तीला ३.९८ किलो हेरॉइनसह ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनची किंमत २४ कोटी रुपये इतकी असल्याचे कळते. सदर कारवाई मंगळवारी करण्यात आली असून या कारवाईमध्ये एका दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन या व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येऊन मुंबईत आली. या व्यक्तीकडे असणाऱ्या ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेमध्ये चार पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या बॅगमध्ये एका गुप्त कप्प्यामध्ये लपवण्यात आल्या होते असे एनसीबीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बॅगाचा पुढील भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या सापडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here