एटापल्ली येथे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

432

– माजी आमदार दीपक आत्राम यांचे हस्ते उदघाटन
– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचीही उपस्थिती
The गडविश्व
एटापल्ली : येथे प्रणय B क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य रात्रकालीन टेनिस बॉल 30 यार्ड क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिकेट सामन्याला उदघाटक म्हणून माजी आमदार दीपक आत्राम तर या उदघाटनीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार उपस्थित होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून आविस तालुका सचिव एटापल्ली प्रज्वलभाऊ नागुलवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक विजयानंद पी.पाटील, आविस युवा कार्यकर्ते मनीकंठ गादेवार, न.पं. सभापती राघव सुल्वावार, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, गुरूपल्लीचे सरपंच कैलास तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अध्यक्ष प्रांजय दहागावकर, उपाध्यक्ष वासुदेव घोष, सचिव अनिकेत मामिळवार, सहसचिव सचिन कोटरंगे, कोशाध्यक्ष सूरज मंडल, क्रीडा प्रमुख सचिन कोटरंगे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here