एटापल्ली : पुनागुडा येथील नागरिकांना विद्युत मीटर न लागताच आले लाईट बिल

233

– विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
– गत चार वर्षांपासून डिमांड भरूनही विद्युत मीटर पासून वंचित
The गडविश्व
शीतल कुंभारे / एटापल्ली , ३ ऑगस्ट : तालुक्यातील पुनागुडा गुरुपल्ली येथे गत चार ते पाच महिन्यापासून विद्युत मीटर लावले नाही मात्र तरी सुद्धा वीज बील आल्याचा प्रकार उघडकीस आलासल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
येथील गावकऱ्यांनी मागील ४ वर्षांपूर्वी विद्युतडिमांड भरला. मात्र आद्यपपर्यंत विद्युत विभागाच्या वतीने विद्युत पुरवठा करण्यात आला नसल्याचे कळते. मात्र असे असतांनाही वीज बिल पाठवण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. सदर बाब राजमुद्रा फाउंडेशनच्या सदस्यांना कळताच त्यांनी पुनागुडा येथे भेट देऊन समस्या जाणून घेतली व विद्युत विभागाबाबत नाराजी व्यक्त करीत पुढाकार घेऊन
समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलून दाखवले.यावेळी राजमुद्रा फाउंडेशनचे एटापल्ली तालुका अध्यक्ष अंकित मामीडवार, उपाध्यक्ष मनीष ढाली, कोषाध्यक्ष वासुदेव घोष, गोरक्षा प्रमुख प्रसंजीत करमकर , दमण मेडीवार,पुनागुडा गावचे पाटील व उमेश गावडे तसेच गावकरी उपस्थित होते.
विद्युत विभागाच्या अशा कारभारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत असून कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here