एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी -गेवर्धा येथील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेसाठी नाशिक ला रवाना

503

– नाशिक येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, १० नोव्हेंबर : नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी/गेवर्धा (स्थित-गडचिरोली) येथील एकूण ११४ विद्यार्थी आज १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. गडचिरोली येथून बसद्वारा रवाना झाले.
नाशिक येथे १२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी/गेवर्धा येथील विद्यार्थी आज रवाना झाले असून त्यांच्या सोबत ३ शिक्षक तसेच ३ शिक्षिका व २ शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्ध आहेत.
दरम्यान सर्व क्रीडा स्पर्धकांना क्रीडा साहित्याचे वितरण करून गडचिरोली प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मैनक घोष , सहाय्यक प्रकल्प अधिकारी मगर मॅडम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोमनकर साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सादमवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गौरकर, एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल चामोर्शी/गेवर्धा स्थित-गडचिरोलीचे प्राचार्य सुभाष लांडे तसेच इतर शिक्षक यांनी स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here