उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पेंढरी कॅम्प कारवाफा तर्फे ‘सरपंच परिषद’ संपन्न

140

The गडविश्व
गडचिरोली / पेंढरी : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मुंडे , अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग पेंढरी अंतर्गत पो स्टे, उपपोस्टे, पो म के. हद्दीतील ग्रामपंचायतीचच्या विकास कामांना गती व चालना मिळावी यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा सचिव व अध्यक्ष यांना मार्गदर्शन व अडीअडचणी दूर करने कामी पो.म. के चातगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पेंढरी तर्फे “सरपंच परिषद” काल २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी पोलीस विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जॉब कार्ड, आधार कार्ड, इतर विमा योजना, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, गोपीनाथ मुंडे विमा योजना, आयुष्यमान कार्ड, रोजगार व प्रशिक्षण, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, आणि विविध योजना बाबत माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे धानोराचे गटविकास अधिकारी कोमलवार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सीमेंट रोड काम, नाली काम, विहीर, बोअरवेल, गावातील वीज सोय, गावातील सांडपाणी याचा वापर योग्य वापर करण्यासाठी करावी लागणारी योजना, ओला कचरा व सुका कचरा याचे व्यवस्थापन व त्यासाठी मिळणारा निधी, गाव स्वच्छता, गावच्या आरोग्य घ्यावयाची दक्षता व कोरोना लसीकरण जण जागृती, अशा अनेक योजना बाबत माहिती देऊन ग्रामपंचायत सरपंच यांना येणार्‍या अडचणीची माहीती घेतली. धानोरा तालुका कृषी कार्यालयाचे पर्यवेक्षक बडवाईक यांनी ग्रामपंचायत येथे सुरू असलेल्या महा पोर्टल वर फ्रॉम भरून शेतकऱ्यांना लागणारी अवजारे, विहिरी, फळ बागा अनुदान, सौर ऊर्जा लाईट अनुदान, फवारणी यंत्र, कशा प्रकारे मिळतात याबाबत माहिती व अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. चतगावचे क्षेत्र सहाय्यक गोडसेलवार यांनी वनविभागाकडे सुरू असलेल्या रोप वाटिका बाबत माहिती देऊन त्या रोपांची लागवड व निगा करण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच ग्रामसभा सचिव व अध्यक्ष यांना ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या विविध योजना व विकास कामे याबाबत माहिती व मार्गदर्शन तसेच शेती विषयक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच आणि ग्रामसभा यांचे अधिकार त्यांची जबाबदारी तसेच सरपंच, सदस्य यांच्या अडचणी व समस्या यावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या गावच्या समस्या लिहून घेण्यात आल्या असून सबंधित विभागाशी पाठपुरावा करण्याची तजवीज केली आहे.
सदर कार्यक्रमास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी, पेंढरी, पोमके चातगाव, कारवाफा, गोडलवाही, गट्टा हद्दीतील १०० ते ११० सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा सचिव व अध्यक्ष उपस्थित होते. सदर सरपंच परिषद ला उपस्थित असलेल्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर सरपंच परिषद यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारवाफा येथील कार्यालयीन पोलीस अंमलदार तसेच पोमके चातगाव येथील पोलीस अधिकारी सपोनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक चौधरी सा. व पोलीस अंमलदार चातगाव यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here